Here’s a list of all of our authors.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Our Authors
मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.18 Articles
विशाल विजय कुलकर्णी राहणार - मु.पो. चिंचवड, पुणे - 33. शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, व्यवसायाने विक्री आणि विपणन (Sales & Marketing) क्षेत्रातील अनुभवी. साहित्य आणि सर्जनशील लेखन ही माझी खरी ओळख आहे. शब्दांशी असलेली नाळ जपत मी कथा, कविता, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लेखन आणि वैचारिक अभिव्यक्ती अशा विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन करत आलो आहे. माझ्या ‘Beyond Thresholds’ या इंग्रजी पुस्तकासह ‘यलगार’ आणि ‘ओलेत्या ओळी पावसाच्या...’ ही ई-पुस्तके (अमेझॉन केडीपी) आहेत. काही वेबसाइट्स तसेच फेसबुक सारखी विविध सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रे, मासिके आणि ‘ऐसी अक्षरे मेळवीन’, ‘कविता माझी सखी’, ‘माझी भटकंती’ या माझ्या वैयक्तिक ब्लॉग्सवर नियमितपणे लेखन करतो. लेखन ही केवळ आवड नसून संवाद घडवण्याचे, विचारांना दिशा देण्याचे आणि ब्रँड्सना प्रभावी शब्दांची ताकद देण्याचे माध्यम आहे, या विश्वासातून मी VKS Storycraft Media या मालकी हक्काच्या (Proprietary) संस्थेची स्थापना केली आहे. VKS Storycraft Media ही संस्था कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्रँड स्टोरीटेलिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि व्यवसायाभिमुख आशय निर्मिती (Business Content Creation) या क्षेत्रात व्यावसायिक सेवा प्रदान करते.17 Articles
मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.17 Articles
विज्ञान विषयाचे 12 वर्षांपासून अध्यापन करीत असून सोबतच विविध नाटकांच्या संहिता लिखाण, शॉर्ट फिल्म्ससाठी कथा लेखन केले आहे. 'आठवणींचं कपाट' हा काव्यसंग्रह प्रकाशित. विविध दिवाळी अंक आणि वर्तमानपत्रातून काव्यलेखन. अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विदर्भ साहित्य संमेलनामध्ये सहभाग. पती गेल्या 25 वर्षांपासून गृहनिर्माण वित्त क्षेत्रात कार्यरत. मोबाइल - 855289339916 Articles
जवळपास 18 वर्षं IT क्षेत्रात recruitment मध्ये कार्यरत होते. त्यानंतर केसरी टूर्समध्ये 3 वर्षं लेखन केले. तसेच, ‘antarnad18.blogspot.com’ हा स्वतःचा ब्लॉग सुरू केला. लोकमत, सकाळ या दैनिकांमध्ये लेखन केले. ज्योतिष शास्त्राचे कुतूहल पहिल्यापासून होते, त्यामुळे 1999पासून या शास्त्राचे अध्ययन केले आणि अविरत करत आहे. माझे परमगुरु श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रुजू आहे. त्यांची कृपा आहे म्हणून सर्व चालले आहे, हा ठाम विश्वास आहे. गेली 10 वर्षं ‘हसत खेळत ज्योतिष शिकूया’ या कार्यशाळांचे झूमच्या माध्यमातून आयोजन करत आहे.16 Articles
किरण कृष्णा बोरकर - मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका. विविध विषयांवरील पुस्तकांचे समीक्षण समाजमाध्यमांवर प्रकाशित. विश्वविक्रमी काव्यवाचन सोहळ्याचे आयोजन. आदिवासी मुलांसाठी वाचनालय स्थापना. समाजाने आपल्याला खूप काही दिलंय आता समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या हेतूने कॉलेजमधील मित्रांसोबत "स्टार्ट गिव्हिंग फाऊंडेशन"ची स्थापना. मुंबईतील रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी मित्रांसोबत "ज्ञानसेवा फाऊंडेशन" सुरुवात केली. पूरग्रस्त, दरड कोसळणे आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी मदतीचा हात. ‘गोष्टी तुमच्या आमच्या’ पुस्तकास 'साहित्यसंपदा पुस्तक रत्न' पुरस्कार. कोकण साहित्य मराठी परिषद, कल्याण यांच्यातर्फे 'उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार'. स्टार्ट गिव्हिंग फाऊंडेशनच्या कार्याबद्दल ‘अष्टगंध पुरस्कार’. साहित्यिक सहभागाबद्दल कोकणदीप मासिक यांचा ‘कोकणदीप प्रेरणा पुरस्कार’. मोबाईल नं : 9969277054 / ईमेल: k.borkar1@gmail.com7 Articles
डॉ. (प्रा.) शैलेंद्र आर. वैशंपायन, आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘डॉ. व्ही.’ या नावाने परिचित आहेत. त्यांना 26 वर्षांचा चिकित्सकीय आणि 25 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. ते होमिओपॅथीवरील चार पुस्तकांचे आणि चार शोधनिबंधांचे लेखक असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित होमिओपॅथिक नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक व्याख्याने दिली असून ‘Dr V’s World of Homoeopathy’ हा त्यांचा पॉडकास्टही आहे. थायरॉईड विकार, चिकित्सकीय संशोधन आणि हॅनिमॅनियन होमिओपॅथी ही त्यांच्या विशेष अभ्यासाची क्षेत्रे आहेत.6 Articles
